राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात येणा-या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून 74 मीटरचा मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. या किल्ल्यावर ध्वज फडकवण्याआधी तो देशातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला फिरवला जाईल.
त्यानंतर 15 ऑक्टोबर 2021 रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. हा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे.
या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं आमदार पवार यांनी सांगितलं.
0 Comments