हिंदवी समाचार : बार्शी शहरातील लेआऊट आणि गुंठेवारी मधील ओपन स्पेस (खुले प्लॉट ) बाबत प्लॉटधारकात जनजागृती होण्याच्या उद्देशाने १सप्टेंबर २०२१ पासुन ओपन स्पेस जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली आहे 


अक्कलकोटे पुढे बोलताना म्हणाले की ,बार्शी शहराचा दिवसेंदिवस वाढता विस्तार,झालेले  होणारे लेआऊट ,गुंठेवारी या पार्श्वभूमीवर प्लॉटधारकाच्या हक्काचे असणारे ओपन स्पेस विक्री होणे, गायब होणे अश्या स्वरूपाच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत माजी मंत्री दिलीप सोपल महा हौसिंग चे माजी अध्यक्ष राजेंद्र मिरगणे ,शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉटधारक नागरिकांत जागृती करून ओपन स्पेस बाबत असणारी कायदेशीर बाजु सांगणे . प्लॉटधारकाची सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मदत करणे आणि सोसायटी स्थापन झाल्यावर नगरपालिका कडे हस्तांतरित केलेले ओपन स्पेस सोसायटी च्या नावे हस्तांतरित करून देणे त्याबाबत माहिती देणे, प्लॉटधारकासमवेत पाठपुरावा करणे असे या अभियानाचे स्वरूप असणार आहे .

एम आर टी पी ऍक्ट मध्ये व गुंठेवारी अधिनियमात ओपन स्पेस बाबत असलेल्या तरतुदी अनेक प्लॉटधारक नागरिकांना माहीत नसल्याने तसेच प्लॉटधारकाच्या एकजुटी अभावी ओपन स्पेस चा गैरवापर होतो आहे .तो रोखणे ही काळाची गरज आहे म्हणुन हे अभियान हाती घेण्यात येत आहे . ज्या ज्या ठिकाणी ले आउट ,गुंठेवारी झालेली आहे तेथील प्लॉटधारकाना एकत्रित करून चर्चा विचारविनिमय करून प्लॉटधारकाच्या हक्काचे ओपन स्पेस प्लॉटधारकाना मिळवून देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असणार आहे . ओपन स्पेस प्लॉटधारकाच्या सोसायटी शिवाय कोणालाही देत येत नाही नगरपालिका त्या जागेची कायदेशीर मालक नसते कायद्याच्या तरतुदी प्रमाणे फक्त सोसायटी होईपर्यंत नगरपालिका कडे या ओपन स्पेस जागेचे हस्तांतरण झालेले असते .
ओपन स्पेस संदर्भात कायदेशीर माहिती देणे ,प्लॉटधारकाची सोसायटी स्थापन करणे ,ओपन स्पेस प्लॉटधारकाना मिळवून देणे असे या अभियानाचे स्वरूप असणार आहे . मिळालेल्या ओपन स्पेस  मध्ये लोकसहभागातून वृक्षसंवर्धन ,लहान मुलांना खेळणी ,दानशूर लोकांच्या सहकार्याने कायदेशीर दृष्ट्या अनुदेय असलेले १० टक्के सामाजिक उपक्रमां साठी बांधकाम करणे कामात प्लॉटधारकाना प्रोत्साहित करणेस मदत करणेत येईल असे अक्कलकोटे यांनी सांगितले .
तसेच ज्या ठिकाणी ओपन स्पेस अतिक्रमण किंवा विक्री असे गैरव्यवहार झाले असतील तर त्या ठिकाणी सर्वतोपरी कायदेशीर मदत मोफत स्वरूपात करून प्लॉटधारकाना त्यांच्या हक्काचा ओपन स्पेस मिळवून दिला जाईल या कामी प्लॉटधारकानी  मोबाईल नंबर ९८५००७१००० ,७०२०२२५०३५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन अक्कलकोटे यांनी केलेले आहे
Attachments area